कोडोली उपजिल्हा रुग्णालयात जागतिक आरोग्यदिन साजरा
कोडोली प्रीतिनिधी:-
कोडोली ता.पन्हाळा येथील उपजिल्हा रुग्णालयमध्ये जागतिक आरोग्यदिना निमित मानसिक आरोग्य व नैराश्य या विषयावर डॉ.सुलेखा साळुंखे यांचे व्याख्यान पार पडले.यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतन्य डॉ.सुधाकर ढेकळे यांचा हस्ते धन्वंतरीचे पूजन करण्यात आले.टी. व्ही मोबाईल या साधनांचा अतिरेक टाळून योगासने,व्यायाम, पौष्टीक आहाराकडे लक्ष देणे बरोबरच कुटुंब,समाज यांच्या समवेत चर्चा वार्तालाप करण्याने आरोग्यात चांगली सुधारणा होतील असे डॉ.सुधाकर ढेकळे यांनी सांगितले.
कोडोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैध्यकीय अधीक्षक डॉ.आर.आर.शेटे यांच्या मार्गदर्शनखाली पार पडलेल्या जागतिक आरोग्यदिनाच्या अनुषंगाने ‘एम.एस.डी फार्मा कंपनी मार्फत अमोल पाटील यांनी एचबी एजेसी हि मधुमेह रुग्णासाठी आवश्यक असलेली ४५ रुग्णाची तपासणी मोफत करण्यात आली.
यावेळी आयुष्य विभागाच्या डॉ.वैशाली पावसे,दंतरोगतद्न्य डॉ.सागर चौत्रे,एड्स नियंत्रकचे समुपदेशक तुषार माळी,मेंट्रन श्रीमती एस.के.जाधव,औषध निर्माण अधिकारी अविनाश माळी,रोहित पाटील,सात्तापा मोरे,कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण कुंभार,प्रयोगशाळा तंत्रंज्ञ संभाजी मोरे,अश्विनी कांबळे,क्षयरोग तंत्रज्ञ स्मिता पाटील यासह अधिकारी,कर्मचारी तसेच रुग्ण व नागरिक उपस्थित होते.