शाहुवाडी पं.स. मध्ये डॉ.आंबेडकरांना विनम्र अभिवादन
मलकापूर प्रतिनिधी :
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126वी जयंती निमित्त शाहुवाडी पंचायत समितीच्या आवारात सभापती डॉ. स्नेहा जाधव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तर उपसभापती दिलीप पाटील यांनी छत्रपती शाहु महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पंचायत समितीमध्ये ही सभापती डॉ स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील यांच्यासह मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शाहुवाडी पंचायत समितीच्या आवारात शाहुवाडी तालुका बौद्ध समाज,शाहुवाडी सेवा संघ, शाहुवाडी पोलीस ठाणे ,भारीप बहुजन महासंघ, आर पी आय गट, सिताई उद्योग समूह, युवा विकास फाऊंडेशन, भारतीय बौद्ध महासभा ,बौद्ध सेवा संघ, विविध सामाजिक संघटना यांच्यावतीनं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शाहुवाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदय पाटील यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी, विविध गावचे बौद्ध समाज बांधव, समाजिक कार्यकर्ते आदि उपस्थित होते.