कोळगावात मोफत आरोग्य शिबीर संपन्न
मलकापूर (प्रतिनिधी ) : कोळगाव तालुका शाहुवाडी इथं युवा विकास फौंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य शिबीर शनिवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ९ते दुपारी ३ वाजेपर्यंत येथील बुद्ध विहारात संपन्न झाले. या शिबिरात सुमारे १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे शिबीर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना व शाहुवाडी तालुका डॉक्टर असोसिएशन यांच्या सहकार्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात रुग्णांची मोफत ई.सी.जी., रक्तदाब, मधुमेह, बी.एम.आय.,आदि रोगांची तसेच डोळ्यांची तपासणी करून उपचार करण्यात आले. प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन कोळगाव चे सरपंच सुभाष पाटील ,उपसरपंच विष्णू कांबळे,विकास कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रा.पं.सदस्या सौ. अरुणा सुरेश कांबळे, पोलीस पाटील राजाराम कांबळे, सुदाम कांबळे,सुरेश कांबळे, प्रा.डी.वाय. शिरसाट, सुरेश कांबळे, यशवंत लोखंडे, संदीप कांबळे,डी.एम. कांबळे,आदि उपस्थित होते.
आरोग्य तपासणी डॉ.संजय जाधव, डॉ. महेश सुतार, डॉ. अशोक जंगटे, डॉ.संपत पाटील ,डी.एम.एल.संतोष चौगुले यांनी रक्तदाब,ई.सी.जी., बी.एम.आय. तपासणी केली.
शिबिरासाठी सिद्धार्थ तरुण मंडळाचे अमित कांबळे, महेश कांबळे, संतोष कांबळे, प्रदीप कांबळे, जयकुमार कांबळे, राजेश कांबळे, राहुल कांबळे, ऋतिक कांबळे, अक्षय कांबळे, आनंद कांबळे, प्रशांत कांबळे, सुरज कांबळे, दिलीप कांबळे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन सुरेस्श कांबळे यांनी केले.
सुंदर न्युज तालुक्यातील सर्व्ह गावात कव्हरेज
thanks