१० मे रोजी सरूड इथून “शांततेसाठी दौड”
बांबवडे ( प्रतिनिधी ) : सरूड तालुका शाहुवाडी इथून “शांततेसाठी दौड” चे आयोजन ‘सरूड स्पोर्ट्स प्रमोशन ट्रस्ट’ च्या वतीने करण्यात आल्याची माहिती रमेश घोलप सरूड-मुंबई यांनी दिली.
१० मे रोजी आयोजित केलेल्या या मॅरेथोन स्पर्धेसाठी १५ वर्षांच्या पुढील खुल्या गटापर्यंत कुणीही या स्पर्धेत सहभाग घेवू शकतो. “रन फॉर पीस” या संकल्पनेतून अवतरलेल्या या स्पर्धेसाठी सुमारे पन्नास हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी सुमारे १० किलोमीटर अंतर असणार आहे. म्हणजेच हि स्पर्धा सरूड इथून सुरु होवून बांबवडे पर्यंत येईल, तिथून पुन्हा परत सरूड इथं येवून स्पर्धेची सांगता होईल. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना १५०००/- रुपये व चषक, १००००/- रुपये व चषक, व ५०००/- रुपये व चषक,तसेच उत्तेजनार्थ हि बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यासाठी इच्छुक स्पर्धकांनी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. नावनोंदणीसाठी नोंदणी शुल्क केवळ २५/- रुपये असणार आहे. तरी अधिकाधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेवून संपूर्ण तालुक्याला शांतीचा संदेश द्यावा,असे आवाहन श्री.रमेश घोलप यांनी केले आहे.
Nice
Thanks.
Very nice
thanks