‘ कुलभूषण जाधव ‘ यांच्यासाठी शाहुवाडी ‘ मनसे ‘ चे निवेदन
मलकापूर प्रतिनिधी
भारतीय नौदलातील अधिकारी कुलभूषण जाधव यांची सुरक्षितपणे मायदेशी सुटका होण्यासाठी केंद्रशासनाने विशेष कायद्याचा आधार घ्यावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाहुवाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी तहसिलदार शाहुवाडी यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, भारतीय नौदलातील अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप करून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.
या शिक्षेतून नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची सुरक्षितपणे सुटका करून त्यांना मायदेशी आणण्यासाठी विशेष कायद्याचा आधार घ्यावा, अशा मागणीचे निवेदन बाळासाहेब कदम यांच्यासह धनाजी आगलावे ,राहुल पाटील, तानाजी सनगर, सचिन कांबळे, संतोष पाटील, गणेश कांबळे, आदिनी दिले आहे.