प्रशांत नाईक ,किरण नाईक दोघे जिल्ह्यातून तडीपार
मलकापूर (प्रतिनिधी ):
भेडसगाव तालुका शाहुवाडी येथील प्रशांत तानाजी नाईक वय 24 व किरण रंगराव नाईक वय 25 या दोघांना कोल्हापूर जिल्ह्यामधून एक वर्षा साठी हद्दपार केले असल्याची माहिती, शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी दिली.
पोलीसांतून मिळालेल्या माहिती नुसार प्रशांत नाईक व किरण नाईक यांचे विरोधात शाहुवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपात गुन्हे नोंद होते. यात खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, व अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तिस मारहाण करणे आदि गुन्हे नोंद आहेत .
यामुळे भेडसगाव व हारूगडेवाडी परिसरातील नागरीकात भितीचे वातावरण पसरले होते. दहशती मुळे या दोघांच्या विरोधात कुणीही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख महादेव ताबंडे, अप्पर पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी . या दोघांच्या विरोधात उपविभागीय अधिकारी अजय यांचे कडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता .
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या दोघांनाही कोल्हापूर जिल्ह्यातूप एक वर्षा साठी हद्दपार केल्याचा आदेश देण्यात आला. या कामी पो .हवालदार एस व्ही पाटील, पोलीस कॉ. राहुल मस्के यांनी हद्दपार आदेशाची अंमलबजावणी केली.