उद्या दि.२३ एप्रिल रोजी शिवसेना व युवासेना शाखांचे वाघवेत उद्घाटन
बांबवडे ( प्रतिनिधी ) : वाघवे तालुका पन्हाळा परिसरातील शिवसेना व युवासेना शाखांचे उद्या दि.२३ एप्रिल रोजी उद्घाटन होणार असल्याची माहिती, नूतन शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी दिली.
शिवसेना आणि युवासेनांचे जाळे जिल्हाभर करण्याचा मानस शिवसेनेचा असल्याने, सेना ग्रामीण भागात रुजली पाहिजे, हि सेनेची भूमिका ग्रामीण जनतेला समजली पाहिजे,आणि सेनेचा फायदा ग्रामीण जनतेला व्हायला पाहिजे ,हा उद्देश ह्या शाखा निर्माण करण्यामागे असल्याचे नामदेव गिरी यांनी सांगितले .
या शाखांचे उद्घाटन शाहुवाडीचे आमदार सत्यजित पाटील,व पन्हाळ्याचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम वाघवे येथील हनुमान देवालय इथं संपन्न होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव,कोल्हापूर जिल्हापरिषदेचे उपजिल्हाप्रमुख सर्जेराव पाटील,कुंभी सह.बँकेचे अध्यक्ष अजित नरके, बाबासाहेब पाटील, संभाजी जाधव शिवसेना पन्हाळा तालुकाप्रमुख, युवराज पाटील, पांडुरंग खाटकी पंचायत समिती सदस्य पन्हाळा , हर्षल सुर्वे युवासेना जिल्हाप्रमुख, रवींद्र चौगुले पं.स.सदस्य, युवराज काटकर युवासेना उपजिल्हाप्रमुख, राहुल पाटील युवसेना पन्हाळा तालुकाप्रमुख , प्रकाश पाटील पं.स.सदस्य , सौ. रेखा बोगरे पं स. सदस्या , सौ लता साठे माजी पं.स. सदस्या व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असून, सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.