भोगावती साखर वर पी.एन.पाटील यांचेच वर्चस्व
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : परिते तालुका शाहुवाडी येथील भोगावती सह.साखर कारखान्याच्या निवडणुकी त कॉंग्रेसचे नेते पी.एन.पाटील यांनी २१ म्हणजे सर्वच्या सर्व जागा जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सडोली खालसा गटातून ५३८१ इतके मताधिक्य घेत, पी.एन. यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी आदि पक्षांनी मिळून दादासाहेब पाटील -कौलवकर अशी आघाडी तयार करून विरोध केला होता. परंतु कॉंग्रेस चे पी.एन.पाटील यांनी सर्व जागा जिंकत जिल्ह्यात अजून कॉंग्रेस चे वजन आहे हे,ह्या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.