कोल्हापुरात आज दोन्ही कॉंग्रेस ची “संघर्ष यात्रा”
कोल्हापूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे,या मागणीसाठी विधानसभा व विधान परिषद मध्ये विरोधकांनी कर्जमाफी च्या मुद्द्यावर शासनाला धारेवर धरले होते. यातूनच संघर्ष यात्रेचे नियोजन करण्यात आले होते.
संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा विदर्भ ते पनवेल असा होता. दुसरा टप्पा कोल्हापुरातून सुरु होत आहे. या यात्रेची सुरुवात क. बावडा येथून शाहू महाराजांना अभिवादन करून करण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही कॉंग्रेस चे दिग्गज नेते कोल्हापुरात कालच दाखल झाले असून, केशवराव भोसले नाट्यगृह इथं ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.