सामाजिक

जखमी गव्याचा अखेर मृत्यू

सोंडोली (प्रतिनिधी ) : मालगाव-जांबूर तालुका शाहुवाडी इथं जखमी अवस्थेत सापडलेल्या गव्याचा अखेर उपचार घेत असताना मृत्यू झाला.
मालगाव-जांबूर येथे जंगलातून चाऱ्याच्या शोधात मादी जातीचा गवा जवळच असलेल्या शेतात आला असता दरडीवरून घसरून पडल्याने त्याच्या पोटाला जबर जखम झाली होती. त्याच्यावर शित्तूर-वारुण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरु होते.परंतु पोटाला जबर मार लागल्याने व पाठीचा मणका मोडल्याने दि.२५ एप्रिल रोजी त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!