स्व.अशोकराव पाटील यांचा रक्षाविसर्जन कार्यक्रम
बांबवडे : स्व. अशोकराव घोडे-पाटील यांच्या रक्षा-विसर्जनाचा कार्यक्रम आज बांबवडे स्मशानभूमीत पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. जयसिंगराव पाटील भाडळेकर, रुद्राप्पा बाऊचकर, महादेवराव पाटील साळशीकर माजी अर्थ शिक्षण सभापती, महादेवराव पाटील माजी पंचायत समिती उपसभापती, नामदेवराव पाटील सावेकर माजी पंचायत समिती उपसभापती,जालिंदर पाटील रेठरेकर, दामाजी पाटील शिवारे, पांडुरंग केसरे, रंगराव खोपडे, नामदेवराव खोत, विशाल साठे आदि दिग्गज मंडळींनी उपस्थिती दर्शविली होती. बांबवडे गावचे सर्व मित्र मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ भाग्याश्रीदेवी गायकवाड यांनी देखील स्व.अशोकराव पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली.
अशोकराव पाटील यांचे उत्तर कार्य रविवार दि.७ मे रोजी आहे अशी माहिती कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली.