रंगराव घागरे यांची चित्रपट मंडळाच्या भरारी पथकावर निवड
शिराळा : पणुंब्रे तालुका शिराळा येथील अभिनेते रंगराव घागरे यांची अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या भरारी पथकावर बिनविरोध निवड झालीय .
मुंबई येथे या निवडीचे पत्र अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते घागरे यांना देण्यात आले.
यावेळी अभिनेते विजय पाटकर, सुशांत शेलार, दिग्दर्शक सतीश रणदिवे, चैत्राली डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.