चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते विनोद खन्ना यांचे कर्करोगाने निधन झाले.
विनोद खन्ना, या अभिनेत्याने एक काळ आपल्या अभिनयाच्या जीवावर गाजवला होता. चॉकलेट हिरो म्हणून ख्याती मिळविलेल्या या अभिनेत्याने अनेक सुपर स्टार कलाकारांबरोबर अभिनय केला होता.अभिनय करत असतंच ते भाजपचे माजी खासदारही होते. गेली बरेच दिवस त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचे खासगी रुग्णालयात निधन झाले.
या कलाकाराला राजकीय, सामाजिक, तसेच कलेच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली.