सावे गावचे माजी सरपंच सीताराम पाटील यांचे अल्पश: आजाराने निधन
बांबवडे ( प्रतिनिधी ) : सावे तालुका शाहुवाडी येथील सीताराम पांडुरंग पाटील (वय ५६ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने आज दि. २८ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता निधन झाले.
सीताराम पाटील हे सावे गावचे माजी सरपंच म्हणून त्यांनी काम पहिले होते. तर माध्यमिक शिक्षक सेवकांची सह,पतसंस्था या संस्थेचे माजी चेअरमन सुद्धा होते. सध्या ते न्यू इंग्लिश स्कूल सावे,तालुका शाहुवाडी इथं लिपिक म्हणून सेवेत रुजू होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.
न्यू इंग्लिश स्कूल सावे च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम रविवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता सावे इथं आहे.