एक अनोखा विवाह सोहळा
देवाळे : देवाळे तालुका पन्हाळा येथील नवविवाहितांनी समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. त्याचे अनुकरण समाजातील अनेकांनी करावे, असेच उदाहरण आहे. येथील सुपुत्र डॉ. मनोज महिपती पाटील PSI व सौ सरिता PSI इचलकरंजी यांनी परंपरागत विवाह सोहळ्याला फाटा देवून समाजकार्याला दोन लाख रुपयांची मदत केली आहे.
या नव दाम्पत्या च्या लग्न सोहळ्यात विवाह मंडपात राजर्षी छत्रपती शाहू महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा लावल्या होत्या. आपल्या विवाहातील खर्चाला पहाता देवून समाजाबद्दलची कृतज्ञता नाम फौंडेशन महाराष्ट्र या संस्थेला ५०,०००/-रु., पोलीस कल्याण निधी मुंबई साठी ५०,०००/-रु., गावातील आपल्या दोन्ही शाळांना २५,०००/-रु.,३०,०००/-रु.,दिलेत. मंदिर व जल संधारण योजनेसाठी ३०,०००/-रु.,व १०,०००/-रु.,पाटणे तालुका शाहुवाडी येथील वाचनालयासाठी ५,०००/-रु. आदि मदत केली आहे. लग्नसमारंभात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला एक झाडाचे रोप दिले. यातून पर्यावरण जपण्याचा संदेश समाजात पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हणूनच या अनोख्या विवाह सोहळ्याचे परिसरातून कौतुक होत आहे.