उदय साखर साठी ५१.५९ टक्के मतदान
बांबवडे : आज बांबवडे तालुका शाहुवाडी येथील उदय सह.साखर कारखान्याच्या ८ जागांसाठी एकूण १८ केंद्रांमध्ये ५१.५९ टक्के मतदान झाले.
उदय साखर साठी १२ जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ८ जागांसाठी बांबवडे तालुका शाहुवाडी येथील महात्मा गांधी विद्यालय व प्राथमिक विद्यामंदिर मध्ये मतदानासाठी आयोजन करण्यात आले होते. एकूण १८ मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली होती. या १८ मतदान केंद्रांमध्ये ८४८० या एकूण मतदानापैकी ४३७५ मतदान झाले. यापैकी उत्पादक गटासाठी ४३३३ ,तर संस्था गटासाठी ४२ मतदान झाले.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
यावेळी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा मानसिंगराव गायकवाड (दादा ), तसेच आमदार सत्यजित पाटील सरुडकर,जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील (बापू )यांनी मतदान केंद्रास भेट दिली.