आंबवडे येथे व्हॉली बॉल स्पर्धेचे उदघाटन
कोडोली प्रतिनिधी :-
आंबवडे ता.पन्हाळा इथं व्हॉली बॉल क्लब आंबवडे यांच्यावतीने भरविण्यात आलेल्या भव्य व्हॉली बॉल स्पर्धा २०१७ चे आज दिनांक ३० एप्रिल रोजी पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा सौ.रुपाली धडेल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. ही व्हॉली बॉल स्पर्धा ३० एप्रिल ते १ मे अशी दोन दिवस चालणार आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ १ मे राजी माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते होणार आहे.
या व्हॉली बॉल स्पर्धा उदघाटन प्रसंगी पन्हाळ्याचे माजी नगरसेवक रविंद्र धडेल, प.स.सदस्य अनिल कंदुरकर, बालन्याय मंडळ सदस्य व्ही.बी.शेट्ये, महिला दक्षता समिती सदस्य अर्चना पांढरे, बाजीराव संकपाळ तसेच नागरिक उपस्थित होते.