‘ उदय साखर ‘वर पुन्हा एकदा ‘मानसिंग दादा ‘ गटाचे निर्विवाद वर्चस्व
बांबवडे ( प्रतिनिधी ) : उदय सह.साखर कारखाना बांबवडे-सोनवडे,तालुका शाहुवाडी, च्या रविवार दि.३० एप्रिल रोजी झालेल्या उर्वरित ८ जागांच्या मतदानातून सर्वच्या सर्व जागा मानसिंग दादा गटाने बहुमताने जिंकल्या आहेत. यातून उदय साखर वर पुन्हा एकदा मानसिंग दादा गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.
उदय साखर च्या १२ जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर ८ जागांसाठी निवडणूक लागली होती. यासाठी रविवार दि.३० एप्रिल रोजी मतदान झाले. त्या मतदानाची आज दि.२ मे रोजी मतमोजणी होती. या मतमोजणीत सर्व म्हणजे ८जागा पुन्हा एकदा मानसिंग दादा गटाने मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत.
उत्पादक सभासद गटातून विजयी झालेले उमेदवार : १. सुरेश बंडू पाटील – ३७८६ २. बाजीराव रामचंद्र लाड – ३८७८ ,३. पंडित बापू शेळके – ३८३६ .
महिला राखीव प्रतिनिधी : १. बेबीताई प्रकाश पाटील – ४०९१. २.किरण संजय चौगुले ४०४२.
अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी :लीला प्रकाश कांबळे ४१७३
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :गणी महम्मद ताम्हणकर ४११०
विमुक्त जाती/ भटक्या जमाती : शेखर भगवान येडगे ४१३४ या विजयामुळे पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण पसरले असून विजयी उमेदवारांचे आणि गट नेत्यांचे अभिनानादन होत आहे.
यावेळी निघालेल्या जल्लोषी मिरवणुकीत संस्थापक मानसिंग दादा, रणवीरसिंग गायकवाड, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ शैलजादेवी गायकवाड यांचे कार्यकर्त्यांनी गुलालाच्या उधळणीत अभिनंदन केले, व मिरवणूक काढली.
सरकार नाद खुळा✌✌✌✌
आम्ही सदैव आबांच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी आहे
आगे बडो हम आपले साथ है…..….
Thanks.