चिक्कूर्डे पूल येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
कोडोली प्रतिनिधी:-
पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्याच्या सीमेवर असणारा, तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणारा अमृतनगर चिक्कुर्डे रस्ता, गेली अनेक वर्षे खराब अवस्थेत आहे. तो रस्ता तयार करून मिळावा. या मागणी साठी ५ गावच्या लोकांनी १ में या महाराष्ट्र दिनी लाक्षणिक उपोषण केले. पन्हाळा पंचायत समिती कडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा आणि पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्याच्या सीमेवर असणारा अमृतनगर-चिक्कुर्डे हा रस्ता गेली अनेक वर्षे दुरावस्थेत आहे. या मार्गावरून प्रामुख्याने प्रवास करणाऱ्या चिक्कुर्डे, निलेवाडी, जुने पारगाव, ऐतवडे आणि कुरळप या गावच्या नागरिकांना या खराब रस्त्याचा प्रचंड त्रास होऊ लागला आहे. गेली अनेक वर्षे हा रस्ता अशाच दुरावस्थेत आहे. या भागातील प्रवाशांनी वारंवर मागणी करूनही, हा रस्ता दुरुस्त होत नाही, म्हणून या पाच गावच्या नागरिकांनी १ मे या महाराष्ट्र दिनी वारणा नदी पुला शेजारी लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी पन्हाळा पंचायत समिती कडून, वरिष्ठ शासन स्तरावर या बाबत दखल घेऊन रस्ता लवकरात लवकर केला जाईल, असे आश्वासन दिल्या नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी बाबासाहेब भोसले, संपत पोवर, वैभव कांबळे, अभिजित पाटील, शहाजी राजे भोसले, राजू पाटील आदी लोक उपस्थित होते.