वळवाच्या पावसाची गारपीट सहित हजेरी
शिराळा,( प्रतिनिधी ) ::आज दुपार पासून शिराळा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चार वाजलेपासून आरळा,गुढे पाचगणी, मानेवाडी,येळापुर कुसळेवाडी, किनरेवाडी परिसरात विजांचा लख लखखाट व ढगांच्या गडगडासह गारांचा पाऊस पडला. कुसळेवाडी येथे वादळी वाऱ्याने अनेक घरांवरील कौले व पत्रे उडाली आहेत.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गारपीटासह वळीवाच्या पावसाने हजेरी लावल्याने, गेले अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे.
कुसळेवाडी येथे निवृत्ती नाईक यांच्या नवीन घरावरील पत्रा उडून गेला आहे. चार विद्युत पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. बांबूचे बेट कुसळेवाडी -पणूंब्रे या मुख्य रस्त्यावर उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
शिराळा,कोकरुड,सागाव,मांगले परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या