सामाजिक

वादळी पावसाने बोरीवडे येथे कर्नाळे यांचे २लाखांचे नुकसान

कोडोली प्रतिनिधी :-
बोरिवडे ता.पन्हाळा येथील बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात एका घराचे छप्पर उडून जाऊन एक ७ वर्षाचा मुलगा जखमी झाला असून, साधारणपणे २ लाखाचे नुकसान झाले आहे.
पूर्व पन्हाळा मध्ये बुधवारी , या वर्षीच्या पहिल्या वळीव पावसानं हजेरी लावली. सुसाट वाऱ्यासह विजांच्या कडकडाटानं सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पावसानं सुरुवात केली. या पावसात बोरीवडे येथील विलास कर्नाळे यांच्या घराचं छप्पर उडून गेलं, आणि पोट माळ्याची भिंत पडली. यामध्ये विलास कर्नाळे यांचा ७ वर्षाचा मुलगा वेदांत हा जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. तसेच त्यांचं प्रापंचिक साहित्याचे हि साधारण पणे २ लाखांचं नुकसान झाले आहे. याबाबत गावच्या तलाठी सुवर्णा कराड यांनी पंचनामा केला आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!