Uncategorizedराजकीय

अखेर शिराळा नगर पंचायत साठी निवडणूक अर्ज दाखल

शिराळा,ता.५: शिराळा नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी आज अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी शेवटच्या दोन तासात १७ प्रभागांसाठी १४१ अर्ज दाखल झाले.
शिराळा नगर पंचायत निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार अखेर मोडीत निघाला असून, आत्ता शिराळा नगर पंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवणूक कार्यालया जवळ सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
गेले आठ दिवसापासून अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव अनेकांनी सुरु केली होती. मात्र अर्ज पहिल्यांदा कोणी भरायचा, म्हणून प्रत्येकांनी माघार घेतली होती. निवडणूक लढवायची असेल, तर अर्ज भरावे लागणार असल्याने, आजच्या दिवसाकडे शिराळा तालुक्याच्या नजरा लागल्या होत्या. सकाळी ११ वाजलेपासून शिराळा पंचायत समिती व तहसील कार्यालय परिसरात शिराळकरांनी गर्दी केली होती. मात्र दुपारी एक वाजेपर्यंत कोणीही अर्ज दाखल करण्यासाठी पुढे आले नाही. एक वाजल्यानंतर मात्र विविध पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल करण्यासाठी निवणूक कार्यालयात गर्दी केली.
जो पर्यंत पारंपरिक पद्धतीने नागपंचमीची साजरी करता येत नाही, तोपर्यंत या निवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिराळा ग्रामस्थांनी घेतला होता. त्यास राजकीय पक्षांनीही गावच्या निर्णय बरोबर आम्ही असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. नागमंडळांनीही निवणुकीवर ठाम रहाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या पहिल्यांदा स्थापन झालेल्या नगर पंचायतवर शिराळकर दुसऱ्यांदा बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे अर्ज भरण्यासाठी छुप्या हालचाली सुरु होत्या. या बाबत एखाद्या पक्षाने शेवटच्या दिवशी अचानक अर्ज भरले तर आपल्या पक्षाची कोंडी होऊ नये, यासाठी सर्व पक्षांनी आपल्या प्रभागनिहाय लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु ठेवली होती. छुप्या पद्धतीने ११०ऑनलाइन अर्ज भरले असले, तरी ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेले नव्हते. त्यामुळे प्रशासनाने गेले आठवडाभर शांत असणाऱ्या निवडणूक कार्यालयात आज गर्दी वाढणार याची शक्यता गृहीत धरून, निवडणूक कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
नगरपंचायतसाठी एकूण १७ प्रभाग आहेत.प्रभाग व दाखल झालेले अर्ज असे १(८),२(९),३(६),४(५),५(६),६(९),७(९),८(८),९(८),१०(१२),११(१०),१२(५),१३(७),१४(१६)१५(८),१६(८),१७(७).सर्वाधिक अर्ज प्रभाग १४ साठी १६अर्ज दाखल झाले आहेत.
आज दि.६ मे रोजी छाननी आहे.
चौकट: शिवसेना बहिष्कारावर ठाम
शिवसेना पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी व्हावी, यासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार,उपजिल्हा प्रमुख नंदकुमार नीलकंठ, मुकुंद जोशी, स्वप्नील निकम, संतोष हिरुगडे, अभिजित दळवी, अभिषेक हसबनीस, रोहन म्हेत्रे, ओंकार हसबनीस यांनी दिली.

Mukund Pawar

Editor

2 thoughts on “अखेर शिराळा नगर पंचायत साठी निवडणूक अर्ज दाखल

 • I amm sur this paragrap has touched alll thee intewrnet viewers, iits reall really fastidioous pot on buiilding uup nnew blog.

  I aam ure tnis articlee hass toucheed all tthe innternet visitors, itss really rally good pos on buiolding uup nnew blog.
  Thiis iss a toppic thaat iss near to mmy heart…
  Best wishes!Exasctly whefe arre yor contacht details though?
  http://foxnews.org

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!