शाहुवाडी बौध्द सेवा संघाची दि.१३ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा
बांबवडे (प्रतिनिधी ) : शाहुवाडी तालुका बौध्द सेवा संघ मुंबई च्या वतीने दि. १३ मे रोजी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच या कार्यक्रमाला इतिहास तज्ञ, सुप्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी धम्मवंदन, महामानवांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २,०० जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ‘ राजगृह ‘ इथं भव्य पटांगणात करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख वक्ते श्रीमंत कोकाटे, शंकर सातपुते, प्रा.प्रकाश नाईक, गिरीश कांबळे, सहदेव गायकवाड , दिलीप बनसोडे,आदि मान्यवर असणार आहेत.
प्रमुख पाहुणे सहा. आयुक्त समाजकल्याण कोल्हापूरचे गायकवाड, रवींद्र खाडे, दीपक कांबळे (डीवायएसपी ), संग्राम देशमुख आयसीआयसीआय बँक , चंद्रशेखर सानप (तहसीलदार शाहुवाडी ),अनिल गाडे (पोलीस निरीक्षक शाहुवाडी ), डॉ.स्नेहा जाधव (सभापती शाहुवाडी पंचायत समिती ), यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुरेशराव गायकवाड साहेब (माजी वित्तीय सल्लागार मंत्रालय महाराष्ट्र ) असणार आहेत.
सभेचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. बापूसाहेब कांबळे मुंबई विद्यापीठ , विजय कांबळे सरचिटणीस स्थानिक बौध्द सेवा संघ शाखा हे करणार आहेत. सभेचे आयोजन शाहुवाडी तालुका बौध्द सेवा संघ स्थानिक शाखेने केले आहे.