उखळू पैकी अंबाई वाडा इथं, वीज कोसळून ५ जखमी
उखळू : अंबाईवाडा (ता. शाहूवाडी) येथील शंकर वकटे यांच्या घरावर वीज कोसळून ५ जण जखमी झालेत. ही घटना शुक्रवारी (ता.१२) रोजी साय.७ च्या सुमारास घडली. चांदोली धरण पारिसरात गेले दोन दिवस वळीवाचा पाऊस सुरु असून, उखळु मणदूर मिरूखेवाडी येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रात्री ७.३० वाजण्याच्या दरम्यान उखळु येथील अंबाईवाडा येथे शंकर वकटे यांच्या घरावर विज कोसळली. या मध्ये शेवंता शंकर वकटे (३६ ), सुरेखा शंकर वकटे (१७) , पुनम शंकर वकटे (१५), प्रजक्ता यशवंत लाखन (२२ ), रामचंद्र शिवाजी वकटे (५५ ) हे जखमी झाले असून आरळा येथील खाजगी रुगणालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.