काँग्रेस ची सकारात्मक ताकद दाखवा – सत्यजित देशमुख
शिराळा ( प्रतिनिधी ): येथील अंबामाता मंदिरात कॉंग्रेसच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख व काँग्रेसचे उमेदवार
शिराळा: नागपंचामीसाठी सरकारला निर्णय घेणे भाग पडू. यासाठी नगर पंचायतमध्ये काँग्रेसची सकारात्मक ताकद दाखवून द्या, असे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले.
येथील अंबामाता मंदिरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी देशमुख म्हणाले , शिराळा शहरामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची विकासकामे झाली असून, या शहरातील मतदार कॉंग्रेस विचारधारेचा आहे. या निवडणुकीत निश्चित कॉंग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल.
यावेळी शिराळा पंचायत समितीच्या सभापती मायावती कांबळे, शिराळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हणमंतराव पाटील, प्रतापराव यादव, सम्राट शिंदे, संभाजी नलवडे, के.डी.पाटील, धनाजी नरूटे, महादेव कदम, शंकर कदम, अजय जाधव, माजी सभापती चंद्रकांत पाटील, अविनाश खोत, संजय जाधव, बाजीराव पाटील, विजय धस, संगीत साळुंखे, राजश्री गायकवाड, अर्चना कदम उपस्थित होते.