मावळा प्रतिष्ठानच्यावतीने पावनगड स्वछता करून छ.संभाजीराजे महाराज जयंती साजरी.
कोडोली प्रतिनिधी:-
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराजांची ३२८ वी जयंती आज पन्हाळगडावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कोडोलीच्या मावळा प्रतिष्ठानच्यावतीने संभाजी महाराज मंदिरामध्ये मूर्ती पूजन करण्यात आले.
मावळा प्रतिष्ठान ने स्वच्छतेतून संभाजी महाराजांची जयंती साजरी करून समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, पन्हाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र जाधव, यांच्या हस्ते मंदिरामध्ये छत्रपती संभाजीराजे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच याठिकाणी सद्भभावना ज्योत हि प्रजवलीत करण्यात आली.हि ज्योत महाराजांचे वास्तव्य असलेल्या सज्जाकोटी पर्यंत पायी नेण्यात आली. तसेच यावेळी पावन गडावरील महादेव मंदिराची हि स्वछता करण्यात आली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विशांत महापूरे ,कोडोली गावाचे सरपंच नितीन कापरे, बहिरेवाडी गावचे उपसरपंच शिरीष पाटील, पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील,पंचायत समिती सदस्य अनिल कंदुरकर ,वारणा बँक संचालक डॉ.प्रताप पाटील,रवींद्र धडेल, रवी पाटील, आदी उपस्थित होते..