पाडळेवाडीत वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे
शिराळा,ता.१३: पाडळेवाडी (ता.शिराळा ) येथे सायंकाळी पाच वाजता झालेल्या वादळी वाऱ्याने १२ घरांची छप्परे उडाली असून, पत्रा अंगावर पडून शांताबाई शिवाजी पाटील(६५) व त्यांची नात सृष्टी बाबासो पाटील(७) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर शिराळा येथे उपचार करण्यात आले. या वादळी वाऱ्याने सुमारे २५ते ३० लाखाचे नुकसान झाले आहे. अंबाईवाडा येथे वीज पडून पाचजण जखमी झाले आहेत.
आज सायंकाळी चार वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे राहुल राजाराम चव्हाण, नामदेव येशु चव्हाण यांच्या घरावर वीज पडून घरावरील पत्रा जळाला. अमोल भीमराव पाटील, सुभाष राजाराम पाटील, युवराज गणपती पाटील, बाबासो शिवाजी पाटील, दत्तू चंद्रू पाटील, श्रीपती खंडू चव्हाण, विलास राजाराम पाटील, बाजीराव सर्जेराव पाटील, शिवाजी श्रीपती पाटील, नाथा रामचंद्र पाटील यांच्या घरांवरील कौले व पत्रे उडाले असून मायाक्का मंदिराचे छप्पर उडाले आहे.