शिवसेनेचा शाहुवाडी तहसील वर शुक्रवारी विराट मोर्चा : आमदार सत्यजित पाटील सरुडकर

बांबवडे ( प्रतिनिधी ): शिवसेना व मित्र पक्षांच्यावतीने शाहुवाडी तहसील कार्यालयावर शुक्रवार दि.१९ मे रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती, आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ईकोसेन्सीटीव्ह झोन , तसेच महामार्गाच्या चौपदारीकरणासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रश्नासाठी, हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ईकोसेन्सीटीव्ह झोनमध्ये समाविष्ट असलेल्या ग्रामस्थांनी व चौपदरीकरणामध्ये भूसंपादन केल्या जाणाऱ्या गावातील ग्रामस्थ , शेतकरी, तसेच त्यांना पाठींबा देण्यासाठी तालुक्यातील इतर गावातील ग्रामस्थांनीही, मोठ्या संख्येने सकाळी १०.०० मलकापूर विठ्ठल मंदिर जवळ उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!