आवळी इथं टेम्पो व दुचाकींचा अपघात : दोन गंभीर जखमी
देवाळे ( प्रतिनिधी ) : कोहापूर-रत्नागिरी महामार्गावर आवळी खिंडीत आज दि.१७ मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पिक-अप टेम्पो ने दोन मोटरसायकल ला जोरदार धडक दिल्याने चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करणात आले आहे.
घटनास्थळावरून व पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आवळी खिंड येथे पिकअप टेम्पो क्र.एम.एच.०८ -डब्ल्यू-३४३७ ने बांबवडे हून देवाळे कडे येणाऱ्या मोटरसायकल क्र.एम.एच.०९ बी.यु. ८२३७ ,तसेच एम.एच.०९ ए.टी.७५९५ या दोन मोटरसायकल ला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील विक्रम बाळासो सुतार वय २० वर्षे राहणार देवाळे तालुका पन्हाळा ,तर सुहास संभाजी सुतार वय १२ वर्षे राहणार दिंडनेर्ली तालुका करवीर हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला आहे. याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक तपास स.पो.नी.विकास जाधव ,ए.एस.आय.पोळ करीत आहेत.
Nice one
Thanks.
Thanks for comment.