माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन
देवाळे ( प्रतिनिधी ) : पन्हाळा-बावडा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील हे एकेकाळी कॉंग्रेस पक्षाचे धुरंदर नेतृत्व होते. सलग पाच पंचवार्षिक निवडणुकीत यश मिळवणारं व जनतेला आपलंस वाटणार हे नेतृत्व आज दि.१७ मे रोजी अनंतात विलीन झालं.
त्यांचे चिरंजीव अमर पाटील सध्या राजकारणाची धुरा सांभाळत आहेत.