माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील अनंतात विलीन
कोडोली प्रतिनिधी:-
विधानसभेत पन्हाळा-गगनबावडा तालुक्याचे सलग २५ वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील काल दिनांक १७ मे रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कालवश झाले. ते ८९ वर्षाचे होते. हृदय विकाराच्या तीव्र झटक्यांने त्यांचं निधन झाले. यांचा अंत्यविधी आज सकाळी १० वाजता पार पडला.
माजी खासदार उदयसिंगराव गायकवड यांना गुरू मानून राजकारणात प्रवेश केले होते, आणि पन्हाळा-गगनबावडा विधानसभा मतदार संघाचे सलग २५ वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे काल दिनांक १७ मे रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी वडगाव येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले. आज सकाळी १० वाजता त्यांचा अंत्यविधी कोडोली येथील दत्त मठी येथील मैदानात करण्यात आला. या वेळी त्यांच्या कोडोली येथील वाड्यातून त्यांची दत्त मंदिरा पर्यंत अंत्य यात्रा काढण्यात आली. त्यांचे कनिष्ठ पुत्र अमरसिह पाटील यांनी त्यांना मुखाग्नी दिली. माजी आमदार पाटील यांच्या पश्चात १ मुलगा ३ मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधीला भेट देण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार महादेवराव महाडिक, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील , अरुण नरके, अजित नरके , गोकुळ दूध संघ संचालक विश्वास जाधव, वारणा बँक अध्यक्ष निपुण कोरे, विश्वेश कोरे आदी उपस्थित होते.