शेतकऱ्यांसाठी आमदारकी पणाला लावू – आम.सत्यजित पाटील
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील इकोसेन्सीटिव झोनला विरोध तसेच निर्बध शिथील करण्या बरोबरच महामार्ग चौपदरी करणात संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी आमदार सत्यजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील शाहुवाडी तहसिल कार्यालय येथे शिवसेना व मित्रपक्षांच्या वतीन भव्य मोर्चा काढून तहसिलदार चंद्रशेखर सानप यांना निवेदन देण्यात आले.
आमदार सत्यजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर विठ्ठल मंदिर येथून मोर्चा ला सुरुवात करण्यात आली .येळाणे, शाहुवाडी येथुन मोर्चाने येऊन तहसिलदार चंद्रशेखर सानप यांना निवेदन देण्यात आले.
यानंतर झालेल्या सभेत बोलताना आमदार सत्यजित पाटील म्हणाले कि शाहुवाडी तालुक्यातील 51गावांचा समावेश झाला आहे.यातील काही गावे कडवी प्रकल्प व अन्य बाबीतुन गावांचे स्थालंतर झाले आहे.तर 39गावांनी इकोसेन्सीटिव्ह झोनला ठरावाद्वारे विरोध केला आहे. या इको झोनमुळे अनेक निर्बंध पडणार असल्याने नागरिकांची कुचंबना होणार आहे .महामार्ग चौपदरी करणातसंपादीत जमिनी बाबत बोलताना आमदार सत्यजित पाटील म्हणाले कि लोकांना विशेष करून शेतकरी बंधुनां पुर्व सुचना न देताच सर्व्हे केला आहे .केवळ मोबदला देवून हा प्रश्न मिटणार नाही. संघटीत राहूनच इकोसेन्सीटिव्ह आणि महामार्ग चौपदरी करण या बाबत लढा देण गरजेच आहे .
या वेळी शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पोवार म्हणाले कि, शेतकऱ्याच्या हितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची शिवसेने ची तयारी आहे .
*** तरी ही शेतकरी बंधूसाठी रस्त्यावर ***
आमदार सत्यजित पाटील म्हणाले आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी देखील शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार शेतकरी बंधूसाठी आम्ही आमची आमदार की पणाला लावू आणि शेतकरी हितासाठी रस्त्यावर उतरू
*** ऊन्हांत बैठक ***
मोर्चा तहसिल कार्यालय आवारात आल्यानंतर रणरणत्या ऊन्हांत च आमदार सत्यजित पाटील यांनीभारतीय बैठक मारली होती.
या मोर्चात सभापती डॉ स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील, जि प सदस्य हंबीरराव पाटील, विजय बोरगे ,शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, प स सदस्य पांडुरंग पाटील, माजी उपसभापती नामदेव पाटील ,अमर पाटील, संचालक दत्ता राणे, यशवंत पाटील, प्रकाश पाटील,सुरेश पारळे नगरसेवक बाबासाहेब पाटील, सुहास पाटील, नगरसेवीका संगीता कुंभार, माया पाटील, संगीता पाटील, माजी नगरसेवक विनायक कुंभार, शौकत कळेकर ,सुधाकर पाटील यांच्या सह शाहुवाडी तालुक्यातील विविध विभागातील शिवसैनिक, मित्रपक्ष आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
माजी नगरसेवक सुधाकर पाटील यांनी प्रास्ताविक तर नगरसेवक सुहास पाटील यांनी आभार मानले.