नागपंचमी केवळ शिराळ्याची नव्हे , तर महाराष्ट्राची अस्मिता – नाम. सदाभाऊ खोत
शिराळा,ता.२०: नागपंचमी शिराळ्याची नव्हे तर महाराष्ट्राची अस्मिता असल्याने राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लावू.सत्ता द्या,अपेक्षित विकास करून शिराळ्याचे वैभव वाढवू . निवडणुकीत दादागिरी करणाऱ्यांचा कायद्यानेच बंदोबस्त करू, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रचार सभेत बोलताना केले.
येथील मरिमी चौकात नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भाजप उमेवारांच्या प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले कि , तोरणा ओढ्याची स्वच्छता करू.येथे औद्योगिक व शैक्षणिक क्रांती घडवून राज्यात आदर्श नगरपंचायत करू.नाथमंदिर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करू. विकासासाठी विधानसभेत प्रमाणे नगरपंचायतीला परिवर्तन घडवा. विरोधकाकडे विकासाचा दृष्टीकोन नाही.
तसेच आम. शिवाजीराव नाईक आपल्या मनोगतात म्हणाले, सत्ता द्या,शिराळ्याला शोभेल अशी नगरपंचायत इमारत उभारू. मतदार जागृत झाला आहे. टीका टिपण्णी पेक्षा विरोधकांनी विकासाचे बोलावे.
इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले कि , नगरपंचायतला पैसे आणण्यासाठी भाजपची सत्ता हवी. आपल्या विचाराची नगर पंचायत आणण्याची हीच संधी आहे. शहराच्या विकासाला बाळ देण्यासाठी आपल्या विचाराची सत्ता हवी.
सम्राट महाडीक म्हणाले,इस्लापुर प्रमाणे शिराळ्यात बदल घडवा. विरोधकांनी गनिमिकाव्याने निवडणूक बिन विरोध करण्याचा आखलेला डाव आम्ही हाणून पडला. सत्तेवर नसणारे विकास काय साधणार,अशी खोचक टीकाही केली..
यावेळी राष्ट्रवादीतुन विनायक गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केला. प्रभाग ११ चे अपक्ष उमेदवार मंदार उबाळे याने भाजपला पाठिंबा दिल्याने त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रणधीर नाईक, सम्राट महाडीक, नरेंद्र सूर्यवंशी,सत्यजित कदम,नेहा सूर्यवंशी, विद्याधर कुलकर्णी, विनायक गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक सुखदेव पाटील यांनी केले.
यावेळी उदयसिंगरव नाईक, रणजितसिंह नाईक,अभिजित नाईक, बंडा डांगे, दिलीप कदम, सत्यजित कदम, उत्तम निकम, केदार नलवडे, माजी जिल्हा परिषद सदस्या वैशाली नाईक उपस्थित होते.उत्तम निकम यांनी आभार मानले.