दुसरा हफ्ता ५०० चा द्या , अन्यथा आंदोलन-स्वाभिमानी संघटना
कोडोली प्रतिनिधी:-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला निवेदन देण्यात आले.गतवर्षी तोडलेल्या उसाचा दुसरा हप्ता ५०० रुपये द्यावा अन्यथा येत्या २३ मे पासून राज्यभर साखर रोको आंदोलन केले जाईल असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. याबाबत संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये योग्य तो निर्णय घेऊ असे कारखाना प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
खाजदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक २८ एप्रिल ते ४ मे पर्यंत जिल्ह्यातून मोटरसायकल रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले हिते. त्या निवेदनानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या गळीत हंगामातील उसाचा दुसरा हप्ता ५०० रुपयाने मिळणे स्वाभाविक आहे आणि तो द्यावा अन्यथा येत्या दिनांक २२ मे नंतर राज्यभर साखर रोका आंदोलन केले जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. सध्या साखरेचे वाढलेले दर, बँकांनी साखरेचं वाढवलेला मूल्यांकन,स्पिरिट आणि इथेनॉलचे वाढलेले दर,मोल्यासिस आणि बग्यासचे वाढलेले दर आणि राजशासनाने कमी केलेला ५ टक्के ऊस खरेदी कर,या सर्व बाबींचा विचार करता गतवर्षीच्या उसाला ५०० रुपये प्रति टन दुसरा हप्ता मिळाला पाहिजे असे निवेदन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारणा कारखान्याला देण्यात आले.
यावेळी कारखाना प्रशासनाकडून प्रभारी कार्यकारी संचालक व्ही.एस.कोले व कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर शेट्ये,सचिन शिंदे, विजय भोसले, संपत पोवार,अजित पाटील,राम शिंदे आदी उपस्थित होते