‘जय महाराष्ट्र ‘ म्हटल्यास पद रद्द -कर्नाटकी शासनाचा नवा फतवा
कोल्हापूर : कर्नाटकात इथून पुढे ‘ जय महाराष्ट्र ‘ घोषणा दिल्यास संबंधित लोकप्रतिनिधींची पद रद्द करण्यात येतील असे कर्नाटका चे नगरविकासमंत्री रोषण बेग यांनी पत्रकारांशी बोलताना हि माहिती दिली. सीमा बांधवांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढच होत चालली असून, महाराष्ट्र सरकार याकडे लक्ष देणार आहे कि नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेळगाव, निप्पाणी, कारवारसह गावांचा महाराष्ट्रात सहभाग व्हावा, अशी अनेक वर्षांची तिथल्या रहिवाशांची मागणी आहे. या मागणीला निवडणूक काळात महाराष्ट्र शासनाने देखील सीमाप्रश्न सोडवण्याचे अभिवचन दिले होते.परंतु त्या दिशेने काही हालचाली अद्याप झाल्या नाहीत. सत्तेत असलेल्या शिवसेनेला तरी या गोष्टींचे भान असणे, गरजेचे होते. त्यातच कर्नाटक शासनाने हा नवा फतवा काढून तेथील मराठी बांधवांच्या छळात अधिकच भर टाकली आहे.