बांबवडे प्रीमिअर लीग२०१७ क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु
बांबवडे ( प्रतिनिधी ) : बांबवडे प्रीमिअर लीग २०१७ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
बांबवडे तालुका शाहुवाडी येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर,भव्य टेनिस बॉलओपन हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हि स्पर्धा तीन दिवस सुरु असणार आहे. या स्पर्धेत आजपर्यंत २० संघांनी सहभाग घेतला आहे.
या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास ७०० १/-रु. व चषक सरपंच विष्णू यादव व अक्षय पाटील युवा स्वराज्य संघ, द्वितीय येणाऱ्या संघास ५००१/-रु. व चषक श्री.महेश निकम व श्री राहुल बंडगर पैलवान ,तर तृतीय येणाऱ्या संघास ३००१/-रु. व चषक जिल्हापरिषद सदस्य पैलवान विजय बोरगे,चतुर्थ येणाऱ्या संघास श्री महेश निकम श्री राहुल बंडगर यांच्या च्या वतीने देण्यात येणार आहे.