शिराळा नगरपंचायत साठी उद्या दि.२४ मे रोजी मतदान : तिरंगी लढतीने निवडणुकीत चुरस
शिराळा,: शिराळा नगरपंचायतसाठी उद्या (ता.२४) रोजी मतदान होत असल्याने ५६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. त्या पैकी १७ जणांचे नशीब उजळणार आहे. नगरपंचायतसाठी ५४९२ पुरुष , तर स्त्री ५०२१ असे १०५१३ मतदार आहेत. प्रभाग १७ मध्ये सर्वाधिक कमी म्हणजे २४२ तर प्रभाग १० मध्ये सर्वाधिक म्हणजे ८९५ मतदार आहेत. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा अशी तिरंगी लढत असल्याने अत्यंत चुरशीने मतदान करून घेण्यावर उमेदवार भर देणार आहेत. परगावी असणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी प्रत्येकांनी आपापली यंत्रणा सज्ज केली आहे. प्रभाग निहाय पुरुष, स्त्री मतदार व कंसात एकूण मतदार असे.
प्रभाग १ मध्ये २४३,२२४(४७६)
प्रभाग २ मध्ये ३५२,३५१(७०३)
प्रभाग ३ मध्ये ३३१,२९०(६२१)
प्रभाग ४ मध्ये २६३,२३४ (४९७)
प्रभाग ५ मध्ये ४२०,३९१(८११)
प्रभाग ६ मध्ये ३६२,३५८(७२०)
प्रभाग ७ मध्ये ३०३,२५६(५५९)
प्रभाग ८ मध्ये ३५०,३०९(६५९)
प्रभाग ९ मध्ये ३६२,३४९(७११)
प्रभाग १० मध्ये ४७४,४२१(८९५)
प्रभाग ११ मध्ये २५०,२३५( ४८५)
प्रभाग १२ मध्ये २८८,२३९(५२७)
प्रभाग १३ मध्ये २७८,२५०(५२८)
प्रभाग १४ मध्ये ३८३,३६५(७४८)
प्रभाग १५ मध्ये ३०३,२९१(५९४)
प्रभाग १६ मध्ये ३९९,३४७(७४६)
१प्रभाग १७ मध्ये १३१,१११(२४२)
एकूण मतदान ५४९२,५०२१(१०५१३)