एसटी अपघातात संजीवनी कॉलेजचा तरुण ठार
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूरमधील उमा टॉकीज जवळ झालेल्या अपघातात संजीवनी इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज पन्हाळा येथील कॉम्प्युटर इंजिनिअरींग च्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेला सुहास युवराज पाटील रहा.उचगाव ता. करवीर, हा तरुण मृत्युमुखी पडला असून, तो कॉलेज मधील हुशार विद्यार्थी होता. याचबरोबर देवास शामराव घोसारवाडे रहा. कांडगाव तालुका करवीर यांचा देखील मृत्यू झाला आहे.
याचबरोबर अपघातात जखमी झालेल्यांची नावे : रमेश सहदेव कांबळे रहा. कांडगाव ता. करवीर , राजाराम भीमराव पाटील रहा. पोलीस मुख्यालय, राजक्का गुलाब पाटील रहा. वाशी ता. करवीर, प्रतिभा योगेश नाळे रहा. सांगरूळ ता.करवीर, बाबुराव केशव वडणगे रहा.७ वि गल्ली, शाहूपुरी, विक्रम विठ्ठल घोरपडे रहा.पाचगाव,ता. करवीर, श्रीपती ईश्वरा पावळकर रहा. दोनवडे ता. करवीर, पांडुरंग गुंडू पाटील रहा. दोनवडे ता. करवीर, सतीश कृष्णात पाटील रहा. मुटके श्वर ता. गगनबावडा. या घटनेमुळे सीपीआर रुग्णालय परिसर नातेवाईकांनी भरला आहे.