…अन्यथा कन्नडीगांना पळताभुई थोडी करू- आम.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : मराठी माणसांवर होणाऱ्या कुरघोड्या कर्नाटक शासनाने थांबविल्या नाही, तर कन्नडिगांना पळताभुई थोडी करू, असा इशारा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे.
कर्नाटक चे नगर विकासमंत्री रोशन बेग यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं दहन करण्यात आले.यावेळी आमदार क्षीरसागर बोलत होते.
कर्नाटक नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी ‘ जय महाराष्ट्र ‘ म्हटल्यास लोकप्रतिनिधित्व रद्द करण्याचा कायदा करू, अशा वल्गना केल्या होत्या. त्यामुळे मराठी जनतेतून उसळलेली हि उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे.
यावेळी आमदार क्षीरसागर पुढे म्हणाले कि, या अगोदर कन्नड रक्षक वेदिके च्या गुंडांमार्फत सीमाबांधवांवर अत्याचार होत होते.आता कर्नाटक शासनातील मंत्री च महाराष्ट्र द्वेष्टी आहेत, हे दिसून आले. मराठी माणसांचा इतिहास कर्नाटक शासनाला माहित नाही. अंगावर आले तर शिंगावर घेण्याची ताकद मराठी माणसात आहे. मराठी माणसांचा अंत पाहू नका, अन्यथा कन्नडीगांना पळताभुई थोडी होईल. याचे या मंत्र्यांनी भान ठेवावे.
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसहित अनेक शिवसैनिक उपस्थित होते.