महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव बंदी
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांना बेळगाव जिल्हाधिकारी यांनी कलम १४४ अन्वये जिल्हाबंदी करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान केला आहे.
आज २५ मे रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव इथं सनदशीर मार्गाने मोर्चाचे नियोजन केले होते. यास पाठींबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत व परिवहन मंत्री नाम. दिवाकर रावते यांनी या मोर्चात सहभागी व्हायचे जाहीर केले. तसा दौराही आखण्यात आला. परंतु कर्नाटकच्या नेहमीच्या रडीच्या डावाप्रमाणे येथील जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी या दोन्ही मंत्र्यांना २४ मे रात्री ८ ते २७ मे रात्री ८ वाजेपर्यंत बेळगावात प्रवेश करू नये ,असे आदेश काढले आहेत. याबाबत सीमावासीयांनी संताप व्यक्त केला आहे.