मराठी माणसांची ताकद, मराठी पद्धतीने दाखवू- श्री नामदेव गिरी
बांबवडे :सध्या सुरु असलेल्या कर्नाटकी धुडगुसाच्या विरोधात महराष्ट्र शासन केवळ निषेध नोंदवून गप्प बसणार असेल, तर महाराष्ट्राच्या जनतेलाच , याबाबत रस्त्यावर उतरावे लागेल.असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी दिला आहे.
कर्नाटक सरकारने महाराष्ट्र विरोधी धोरण स्वीकारल्याने छुटुकभर पोरं सुद्धा महाराष्ट्राच्या एसटी त येवून धुडगूस घालण्याचं धाडस दाखवतात, हि बाबच मुळी संताप निर्माण करणारी आहे. आज एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार कर्नाटकाच्या काही गुंडांनी महाराष्ट्राच्या एसटीत धुडगूस घातला. अशांना कर्नाटकी पोलिसांनी देखील काय कारवाई केली,याबाबत माहिती सांगितली नाही. म्हणजेच कर्नाटक सरकार सुद्धा त्यांना पाठीशी घालण्याचा खुलेआम प्रयत्न करत आहे. अशांच्या विरोधात महाराष्ट्र शासन काही करणार आहे कि, नाही? असा प्रश्न इथं उपस्थित होत आहे. याबाबत शासनाने लवकरच पावले न उचलल्यास मराठी माणसांची ताकद, मराठी पद्धतीने दाखविण्यात येईल, याचे भान ठेवावे, असा इशाराही श्री नामदेव गिरी यांनी दिला आहे.