दरेवाडी त “पैलवान प्रतिष्ठान” शाखेचे स्थापना
आसुर्ले : दरेवाडी गावामध्ये संस्थापक श्री. महेश मोरे यांच्या हस्ते “पैलवान प्रतिष्ठान” शाखेची स्थापना करण्यात आलीय.
दरेवाडी सारख्या एखाद्या छोटय़ाशा गावामधून एखादा तरी पैलवान व्हावा, व तो ‘ हिंदकेसरी ‘ व्हावा, यासाठी प्रयत्न म्हणून दि 28 रोजी सायंकाळी सहा वाजता “पैलवान प्रतिष्ठान” चे संस्थापक मा. महेश मोरे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले . त्या संस्थेच्या अध्यक्षपदी अमोल गायकवाड व उपाध्यक्षपदी अमोल जाधव यांची निवड करण्यात आली. त्यावेळी त्यांनी गावामध्ये तालीम बांधून देण्याचं आश्वासनं दिले.
यावेळी महेश नलवडे, विकी माने, शामराव मोळे, शौकत आगा, दरेवाडीतील सर्व तरुण मंडळांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य आदि मंडळी उपस्थित होते.