देववाडी इथं बलात्कार प्रकरणी दीपक शिंदे वर गुन्हा दाखल
शिराळा ( प्रतिनिधी ) : देववाडी तालुका शिराळा येथील २८ वर्षीय युवतीवर बलात्कार प्रकरणी दीपक बाबासो शिंदे (वय ३२ वर्षे ) याच्यावर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहित अशी कि,शिंदे याने पिडीत युवतीला लग्नाचे आमिष दाखवून सप्टेंबर २०१२ पासून जानेवारी २०१७ पर्यत वेगवेगळ्या ठिकाणी नेवून बलात्कार केला. तसेच धमकी देवून मारहाण सुद्धा केली.
पुढील तपास सहय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर गायखे करीत आहेत.