शिराळ्यात दोन मोटरसायकल ची समोरासमोर धडक : १ ठार ,तर २ गंभीर जखमी
शिराळा : येथील गोरक्षनाथ मंदीरानजीक शिराऴा बाहयवळण रस्त्यावरील चैाकात मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत रमेश राजाराम आलुगडे (३५) रा.भाटशिरगाव ता.शिराळा हा युवक जागीच ठार झाला, तर शिवाजी नारायण सुर्यवंशी व मोहन बाबासाहेब सुर्यवंशी रा.बोरगाव ता.वाळवा हे दोघे गंभार जखमी झाले.
ही घटना शुक्रवारी रात्री साडेबारा वाजनेच्या सुमारास घडली.
या बाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी की, मयत रमेश आलुगडे हा मोटरसायकल वरून शिराळ्या कडून भाटशिरगावाकडे निघाला होता. तर शिवाजी सुर्यवंशी व मोहन सुर्यवंशी हे दोघे मोटरसायकल वरून इस्लामपूरकडे निघाले होते. त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये रमेश हा जागीच ठार झाला,तर शिवाजी व मोहन हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शिराळा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना कराड येथील खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले. या अपघाताची नोंद शिराळा पोलीसात झाली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस फैाजदार बी.एम.घुले करत आहेत.