शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या घोषणा

कोल्हापूर : आज दि. ३ जून रोजी शेतकऱ्यांच्या संपा संदर्भाने मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या आहेत.
* अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी.
* हमीभावापेक्षा कमी भाव देणे , हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल.
* राज्य कृषिमूल्य आयोगाचे गठन करण्यात येईल.
* दुधाचे भाव वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. किमत २० जून पर्यंत निर्णय होईल.
* दुधाच्या भावासंदर्भात तटस्थ निरीक्षक नेमण्यासंदर्भात विचार.
* वाढीव वीज बिलाचा पुनर्विचार .
* थकीत बिलाचे व्याज आणि दंडव्याज रद्द करण्याचा निर्णय.
* शीतगृह साखळी निर्माण करणार.
* नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग आणणार.
* त्यासाठी सबसिडीवर आधारित योजना .
* शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेतले जातील, मात्र गुंडांवर चे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत.
* आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या अशोक मोरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात येणार.
* मायक्रोफायनान्स च्या माध्यमातून शेतकऱ्यांची लुटमार थांबवणार .
या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्या.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!