शेतकऱ्याच्या हाकेला भक्कम प्रतिसाद : बांबवडे,सरूड बाजारपेठ कडकडीत बंद

बांबवडे : शेतकरी संपाला पाठींबा दर्शवण्यासाठी किसान क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. हाकेला प्रतिसाद देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आवाहन केले होते. याला प्रतिसाद म्हणून आज शाहुवाडी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ बांबवडे, सरूड बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून व्यापारी वर्गाने, शेतकऱ्याला भक्कम पाठींबा दर्शविला आहे.
बांबवडे ,सरूड येथील व्यापार्यांनी कडकडीत बंद पळाला.दुकाने, हॉटेल्स,बंद ठेवल्याने प्रवाशांना याचा त्रास झाला.परंतु शेतकऱ्यांच्या व्यथांना समजून घेत नागरिकांनीही या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गावातून निषेध फेरी काढली. या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे बांबवडे स्थानका समोर दहन केले. त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या,तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात घोषणाबाजी झाली.
यावेळी स्वाभिमानी संघटनेचे सुरेश म्हौटकर स्वाभिमानी युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अवधूत जानकर, सुनील पाटील, अजित पाटील, तुकाराम खुटाळे, रायसिंग पाटील व स्वभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!