सागांव मध्ये विनयभंग : शिराळा पोलिसात फिर्याद

शिराळा : सागांव तालुका शिराळा येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अजित चंद्रकांत कांबळे रहा. सागांव याच्यावर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अजित हा फरार आहे.
याबाबत सदरच्या मुलीने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. हि घटना १ जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत पोलिसात मिळालेली माहिती अशी कि, १ जून रोजी सकाळी मुलीचे आईवडील देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होते.दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान सदरची मुलगी अंगणात भांडी घासत होती.त्यावेळी तिचा लहान भाऊ व बहिण बाहेर खेळण्यासाठी गेले होते. दरम्यान अजित कांबळेने त्याठिकाणी येवून तू मला आवडतेस, मला भेटण्यासाठी संध्याकाळी ये ,असे म्हणून सदरच्या मुलीचा हात पकडून विनयभंग केला. टी मुलगी घरात पळून गेल्यानंतर त्याने दारातून च याबाबत कोणाला बोललीस तर गावात राहून देणार नाही, अशी धमकी दिली. ३ जून रोजी परत आल्यानंतर मुलीने सदर च्या घटनेची आपल्या आई-वडिलांना माहिती दिली.पुढील तपास सहाय्यक फौजदार बी.एम,घुले करीत आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!