‘महाजनकी ‘ च्या शेतात आनंदा खुडे यांचे प्रेत
शिराळा : पाडळीवाडी (ता.शिराळा) येथील ‘महाजनकी ‘ च्या शेतात घबकवाडी (ता.वाळवा) येथील बेपत्ता झालेल्या आनंदा दादु खुडे (५८)या वृध्दाचा मृतदेह आढळून आला.
याबाबत शिराळा पोलीसातून मिळालेली माहिती अशी की,आनंदा दादू खुडे यांना बुधवारी ३० मे रोजी कुत्रे चावले होते. त्यावेळी त्यांनी रँबीजचे इंजेक्शन घेतले होते. त्यांना पुन्हा दुस-या दिवशी ३१ मे रोजी कुत्रे चावले होते. त्या नंतर आनंदा यांच्या वागण्यात फरक पडला होता.
३१ मे रोजी ते घरातून कोणासही न सागंता निघून गेले. घरच्या लोकांनी त्यांचा नातेवाईकांच्याकडे शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत.
आज मंगळवार रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पाडळेवाडी येथील ‘महाजनकी ‘ च्या शेतातील विनू धोंडीराम पाटील यांच्या शेतात अज्ञाताचा मृतदेह असल्याचे आढळून आले. पोलीस पाटील मोहन घेवदे यांनी शिराळा पोलीसात कळवीले. तो मृतदेह घबकवाडी येथील आनंदा दादू खुडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शिराळा येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. याबाबत शिराळा पोलीसात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फैाजदार बी.एम.घुले हे करीत आहेत.