नगराध्यक्ष पदासाठी तीन अर्ज दाखल
शिराळा,ता.७: शिराळा नगरपंचायत ‘नगराध्यक्ष ‘ पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामार्फत आज सौ. सुनंदा सोनटक्के तर भाजपा च्यावतीने नेहा सूर्यवंशी, सीमा कदम यांनी उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार दीपक शिंदे यांच्याकडे दाखल केले.
छाननीत तिन्ही अर्ज वैध झाले आहेत. प्रभाग क्रमांक ४,६,१५ हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी राखीव असल्याने त्या प्रभागातून निवडून आलेल्यांचे अर्ज वैध ठरवावेत. राष्ट्रवादीच्या सुनंदा सोनटक्के त्या प्रभागातू निवडून आल्या नसल्याने, त्यांचा अर्ज अवैध ठरवावा, अशी तक्रार भाजप च्या नेहा सूर्यवंशी यांनी केली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी बाबत उद्या ( ता.८) गुरुवारी सकाळी ११ वाजता निर्णय घेतला जाईल असे सांगितले. यावेळी तहसीलदार दीपक शिंदे, मुख्याधिकारी ए. के. कुंभार उपस्थित होते.
अर्ज भरताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, तालुक्याचे उपसभापती सम्राटसिंग नाईक, युवा नेते विराज नाईक, विश्वासचे संचालक विश्वास कदम, संपतराव शिंदे, माजी सरपंच देवेंद्र पाटील , गजानन सोनटक्के, माजी उपसरपंच सुनिल कवठेकर, अशोक गायकवाड, नगरसेवक गौतम पोटे, संजय हिरवडेकर, किर्तीकुमार पाटील, मोहन जिरंगे, विजय दळवी, सुजाता इंगवले, आशाताई कांबळे, सुनिता निकम, अर्चना शेटे, प्रतिभा पवार, राजेंद्र निकम, दस्तगीर अत्तार, सरदार पठाण, बश्वेश्वर शेटे, प्रताप मुळीक, प्रमोद पवार, रवि पाटील, अविनाश चितूरकर, मंगेश कांबळे, संजय कोरे, घन:श्याम आवटे, वासिम मुल्ला, सागर नलवडे, डॉ. प्रदीप काकडे तर भाजपाचे रणजितसिंह नाईक, उत्तम डांगे,नरेंद्र सूर्यवंशी,सीमा कदम,नेहा सूर्यवंशी,उपस्थित होते.