गद्दारांना जागा दाखवू – राजू शेट्टी
नाशिक : आमच्या स्वाभिमानी संघटनेतही काही गद्दार आहेत,त्यांनाही धडा शिकवू, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
यावेळी ते म्हणाले कि, या सरकारला मते द्या, असे म्हणत गावोगाव फिरलो, त्याचा पश्चाताप होतोय, आणि सदाभाऊ हा तर स्वाभिमानी चा गद्दार आहे, त्यांची जागा त्यांना नक्कीच दाखवू. असेही राजू शेट्टी यांनी सुकाणू समितीच्या बैठकीत सांगितले.